Sanjay Raut on Nanded Hospital Deaths In Marathi : महाराष्ट्रातील नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचा आकडा वाढला आहे. सोमवारी 24 मृत्यू झाल्यानंतर आजही 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशाप्रकारे नांदेडच्या रुग्णालयात जीव गमावणाऱ्यांची संख्या आता 31 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजी नगरच्या घाटी हॉस्पिटलमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. गेल्या 24 तासांत या रुग्णालयात 2 नवजात बालकांसह 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut Latest News) यांनीही सरकारवर टीका केली आहे.
काय म्हणाले राऊत? (Sanjay Raut on Nanded Hospital Deaths)
संजय राऊत म्हणाले, ”महाराष्ट्राची आरोग्य स्थिती नेहमीच चांगली राहिली आहे, परंतु गेल्या एका वर्षात ज्या प्रकारे महाराष्ट्रातील सर्व सरकारी विभाग काम करत आहेत, ना आरोग्यमंत्री काम करत आहेत, ना सरकारी डॉक्टर काम करत आहेत आणि कोणाचेही नियंत्रण नाही. आरोग्य विभाग हा महाराष्ट्रातील सर्वात दुर्लक्षित विभाग आहे.”
हेही वाचा – Nanded Hospital Deaths : नांदेडमधील घटनेवर राज ठाकरे काय बोलले?
नांदेडच्या या रुग्णालयात (Nanded Hospital Deaths Update) गेल्या 24 तासांत 24 जणांना जीव गमवावा लागला असून त्यात 12 बालकांचा समावेश आहे. आता आणखी 7 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 4 मुलांचा समावेश आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे या लोकांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर श्यामराव वाकोडे यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि औषधांचा तुटवडा यामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याचेही ते म्हणाले. तपासासाठी तीन सदस्यीय पथक तयार करण्यात आले असून त्यांना मंगळवारपर्यंत अहवाल सादर करायचा आहे, असे सांगण्यात आले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!