Uddhav Thackeray On Sanjay Raut Arrest : राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा केंद्राकडून सुपारी घेत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केला. संतप्त ठाकरे म्हणाले की, केंद्रीय यंत्रणा केंद्राच्या पाळीव प्राण्यांप्रमाणे वागत आहेत. केंद्र सरकारची सुपारी घेऊन ते राजकीय विरोधकांना लक्ष्य करतात. हे बंद केले पाहिजेत. यासोबतच संजय राऊत यांना पुन्हा अटक होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. तुरुंगातून राऊत बाहेर आल्यानंतर ते ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’वर पोहोचले होते.
राऊत यांना पुन्हा खोट्या प्रकरणात अडकवू शकतात : ठाकरे
ठाकरे म्हणाले, की केंद्र सरकार अजूनही त्यांना (राऊत) इतर खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करू शकते. ते म्हणाले, “संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत पण त्याहीपेक्षा ते माझे जवळचे मित्र आहेत. तुरुंगाची वेळ त्याच्यासाठी जितकी कठीण होती तितकीच ती आमच्यासाठी होती कारण आम्ही एक कुटुंब आहोत. संकटाच्या वेळी ते आमच्या पाठीशी उभे राहिलेच नाही तर एकत्र लढले. संजय राऊतला बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली होती, त्याला एकापेक्षा जास्त प्रकरणात अडकवून अटक करण्याचे आणखी प्रयत्न केले जाऊ शकतात.”
सत्यमेव जयते!
जामीन मंजूर झाल्यानंतर खासदार संजय राऊत जी यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जी यांची भेट घेतली. त्यांचे स्वागत सौ. रश्मी वहिनी ठाकरे यांनी औक्षण करून केले.
शिवसेनेचा हा रोखठोक आवाज आता पुन्हा बुलंद होणार! pic.twitter.com/0QDwf6vmBJ
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) November 10, 2022
हेही वाचा – सानिया मिर्झा-शोएब मलिकचा ‘कथित’ घटस्फोट पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे? वाचा तिच्याबद्दल…
उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर सूडाचे राजकारण केल्याचा आरोप केला आणि जनतेला त्याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले. ठाकरे म्हणाले, केंद्राकडे तत्व असते तर राऊत यांना कधीच अटक झाली नसती. सरकारचा कारभार आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरावर संपूर्ण देश लक्ष ठेवून आहे.
तत्पूर्वी उद्धव यांनी राऊत यांचे जंगी स्वागत केले. हसतमुख आदित्य ठाकरे यांनी राऊत यांना मिठी मारली. पक्षाच्या इतर अनेक नेत्यांनी मिठाईचे वाटप केले. ठाकरे यांनी राऊत यांचे एक खरे मित्र असे वर्णन केले ज्यावर शेवटपर्यंत विसंबून राहू शकतो, जो कधीही पाठीत वार करू शकत नाही. सर्व दबाव आणि त्रास सहन करूनही राऊत घाबरले नाहीत किंवा पळून गेले नाहीत आणि पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले.