Chandrakant Patil : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिंचवड गावांमध्ये पाटील हे एका कार्यकर्त्याच्या घरी आले होते. तेव्हा त्यांच्यावर हा शाई फेकण्यात आली. पाटील यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चोख पोलीस बंदोबस्त असतानाही ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
हा हल्ला झाल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. चंद्रकांत पाटील आज पिंपरीत मोरया गोसावी या गणपती देवस्थानाच्या संजीवन समाधी सोहळ्याला हजेरी लावणार होते. तत्पूर्वी ते एका कार्यकर्त्याच्या घरी आले होते.
हेही वाचा – Bajaj Pulsar कायमची बंद..! २० वर्षांची साथ तुटली; ‘नव्या’ बाइकनं घेतली जागा
वादग्रस्त विधानानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक… #ChandrakantPatil pic.twitter.com/tHnYv87RHm
— Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) (@jogalshailaja) December 10, 2022
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थोर महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ कोथरूड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले होते. त्यातच चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीकडून घोषणाबाजीही करण्यात आली.