Salman Khan Gets Death Threat : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीच्या धमक्यांदरम्यान सलमान खानला सोमवारी रात्री पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्याला राजस्थानमधील जोधपूर येथून एका ‘रॉकी भाई’चा फोन आल्याचे सांगण्यात येत आहे. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. वृत्तानुसार, राजस्थानमधील शाहपूर येथील एका 16 वर्षीय मुलाने हा कॉल केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अल्पवयीन मुलाला शहापूर येथून ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी त्याला मुंबईत आणले जात आहे. मात्र हा कॉल का करण्यात आला याची माहिती घेण्यासाठी त्याची चौकशी करण्यात येणार आहे.
एएनआयने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, नियंत्रण कक्षाला काल एक कॉल आला होता, ज्यामध्ये राजस्थानमधील जोधपूर येथील रॉकी भाई अशी ओळख असलेल्या एका व्यक्तीने अभिनेता सलमान खानला 30 एप्रिल रोजी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुंबई क्राईम ब्रँचने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर अल्पवयीन मुलाला अटक करण्यात येईल.
Salman Khan gets another death threat, Mumbai Police begins probe
Read @ANI Story | https://t.co/WH6GDgymw7#SalmanKhan #deaththreat pic.twitter.com/1yjLHQnj7U
— ANI Digital (@ani_digital) April 11, 2023
हेही वाचा – SSC CGL 2023 : स्टाफ सिलेक्शनमध्ये बंपर भरती..! 7500 जणांसाठी नोकरी; ‘असा’ भरा अर्ज!
विशेष म्हणजे सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे त्याची सुरक्षा आणखी कडक करण्यात आली होती. यापूर्वी सलमान खानला काही आठवड्यांपूर्वी ई-मेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली. अलीकडेच त्याने बुलेटप्रूफ क्षमता असलेली 7 सीटर SUV खरेदी केली आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये कथित सहभाग असलेल्या कुख्यात गुंड गोल्डी ब्रारच्या ईमेलद्वारे सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई व्यतिरिक्त गोल्डी ब्रार आणि रोहित ब्रार यांच्यावरही अभिनेत्याला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
सततच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमान खान आता त्याच्या बुलेटप्रूफ कारमधून फिरत आहे. सोमवारी संध्याकाळी तो त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी त्याच्या बुलेटप्रूफ कारमधून मुंबईतील जुहू येथील थिएटरमध्ये पोहोचला होता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!