Salman Khan Security : मुंबई पोलिसांनी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या सुरक्षेत पूर्वीपेक्षाही वाढ केली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या आल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानला सुरक्षा दिली होती. पण आता सलमानच्या जीवाला धोका पाहता मुंबई पोलिसांनी त्याची सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक कडक केली आहे.
अलीकडेच सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतरच अभिनेत्याला X श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, सलमानच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांच्या संरक्षण शाखेने त्याची सुरक्षा Y+ श्रेणीत वाढवली आहे.
Maharashtra | Mumbai police to provide Y+ security cover to actor Salman Khan. The step has been taken by the state govt after the actor received a threat letter from Lawrence Bishnoi gang earlier: Maharashtra Police
(File Pic) pic.twitter.com/0CjJuE3Zqm
— ANI (@ANI) November 1, 2022
हेही वाचा – ‘या’ क्षेत्रात महाराष्ट्राला नंबर १ बनवणारच..! उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ‘मोठा’ निर्धार
सलमान खानच्या सुरक्षेचा विचार करून त्याच्यासोबत नेहमीच एक पोलीस रक्षक शस्त्रांसह तैनात होता. मात्र आता सलमानच्या सुरक्षेत वाढ केल्याने एक-दोन नव्हे तर चोवीस तास शस्त्रांसह सलमानच्या सुरक्षेखाली पोलिस राहणार आहेत. हे सर्व सलमान खानला मिळालेल्या धमकीनंतर करण्यात आले. सलमानला शक्य ते सर्व संरक्षण देण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
सुरक्षेच्या अंतर्गत सुरक्षा पुरवण्यात आलेला सलमान खान एकमेव नाही. सलमान खान व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेतही बदल करण्यात आले आहेत. सलमान खानप्रमाणेच आता अमृता फडणवीस यांच्यासोबत सशस्त्र सुरक्षा रक्षकही त्यांच्या संरक्षणात तैनात असतील. या दोघांसोबत, अभिनेते अनुपम खेर, उद्योगपती अजय पिरामल आणि आनंद पिरामल यांना सुरक्षा वाढवताना Y+ सुरक्षा दिली आहे.