‘सैराट’ फेम ‘प्रिन्सदादा’ला अटक होण्याची शक्यता..! वाचा नक्की घडलंय काय

WhatsApp Group

Sairat Fame Actor Suraj Pawar : ‘सैराट’ या मराठी चित्रपटात ‘प्रिन्स’ची भूमिका साकारणारा अभिनेता सूरज पवार अडचणीत सापडला आहे. त्याला कोणत्याही वेळेला अटक होण्याची शक्यता माध्यमांतून वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी सूरज पवारची चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. फसवणूक प्रकरणातील त्याच्या कथित भूमिकेच्या संदर्भात सूरज पवारला बोलावलं जाईल, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

नक्की प्रकरण काय?

सैराटसोबत सूरज पवार यानं नागराज मंजुळे यांच्या ‘पिस्तुल्या’ आणि ‘फँड्री’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांमध्येही काम केलं. राज्य सचिवालयात सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्यानं इतर तिघांवर फसवणूक केल्याचा आरोप सूरजवर आहे. नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर या नामक व्यक्तीला सचिवालयात नोकरी देण्याचं आमिष दोघांनी दिलं होतं. यासाठी त्यांच्याकडून ५ लाखांची मागणीही करण्यात आली होती. नोकरी लागल्यावर तीन लाख तर सुरुवातीला २ लाख अशी ५ लाखांची मागणीही करण्यात आली महेश हे पैशांचं पाकीट देण्यासाठी राहुरी इथे गेले पण तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

हेही वाचा – Lumpy Skin Disease : काय आहे हा लम्पी आजार? कसा पसरतो? कसा थांबवायचा? वाचा इथं!

यासंबंधात त्यांनी तक्रार केली आहे. त्यामुळं या प्रकरणाच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावलं जाईल, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. सचिवालयात सरकारी नोकरी लावण्याच्या बहाण्यानं लोकांची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना अहमदनगर पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी अटक करून एका टोळीचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि यात सूरजनं नोकरीचं आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

‘सैराट’ चित्रपट आल्यानंतर आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या, प्रिन्स यांची भूमिका सर्वांच्या मनावर कोरली गेली. यात आर्चीच्या भावाची, परश्याचा मेहुणा ‘प्रिन्स’ची भूमिका सूरज पवारनं साकारली होती. सूरजचा ‘घर, बंदूक, बिर्याणी’ हा चित्रपट लवकरच येणारर आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment