पालघरजवळ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार, पोलिसासह चौघांचा जागीच मृत्यू!

WhatsApp Group

Palghar : महाराष्ट्रातील पालघर स्थानकाजवळ सोमवारी पहाटे जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रेल्वेतील आरपीएफ कॉन्स्टेबल आणि एएसआय यांच्यात काही कारणावरून भांडण झाले. दोघांमधील वाद इतका वाढला की आरोपी कॉन्स्टेबलने आपली रायफल काढून गोळीबार सुरू केला. या घटनेत एएसआयसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला. जीआरपी आणि आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. जयपूर एक्स्प्रेस गाडी गुजरातहून महाराष्ट्राची राजधानी मुंबईकडे जात होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पाचच्या सुमारास जयपूर एक्स्प्रेस गाडीच्या पालघर स्थानकाजवळील बोगी क्रमांक-5 मधून गोळीबाराचे आवाज येऊ लागले. कॉन्स्टेबल चेतन कुमार चौधरी यांचा एएसआय टिका राम मीणा यांच्याशी काही कारणावरून वाद झाला. दोघांचे भांडण खूप वाढले. रागाच्या भरात आलेल्या हवालदाराने आपल्या अधिकृत रायफलने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यावेळी गोळीबाराच्या अनेक फैरी झाडण्यात आल्या. यात हवालदार आणि अन्य तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत आणखी काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. आरोपी कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : महिन्याच्या शेवटी पेट्रोल-डिझेलचे रेट काय? वाचा आजचे दर!

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरपीएफ जवान मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून पालघरचे अंतर सुमारे 100 किमी आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल चेतन कुमार चौधरी यांनी त्यांच्या एस्कॉर्ट ड्युटी इनचार्ज एएसआय टिका राम मीना यांना चालत्या ट्रेनमध्ये गोळ्या घातल्या. आपल्या सिनियरला गोळी मारल्यानंतर हवालदार दुसऱ्या बोगीत गेला. तेथे त्याने अन्य तीन प्रवाशांवरही गोळ्या झाडल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment