Rohit Sharma On Suryakumar Yadav Catch In Marathi : दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात सूर्यकुमार यादवने असा झेल घेतला ज्याने संपूर्ण सामन्याचा मार्गच बदलून टाकला. सूर्यकुमार यादवने शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड मिलरचा बाऊंड्रीजवळ उत्कृष्ट झेल घेतला आणि भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.
विश्वविजेता झाल्यानंतर भारतीय टीमची मुंबईत जंगी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर भारतीय संघातील महाराष्ट्राचे खेळाडू कप्तान रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल यांना राज्य शासनाकडून प्रत्येकी एक कोटींचे बक्षीस जाहीर झाले. विधानभवनात सेंट्रल हॉल मध्ये चारही खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी रोहित आणि सूर्याने मराठीतून भाषण केले.
Typical Mumbaikar Rohit Sharma 🙏
— Vinesh Prabhu (@vlp1994) July 5, 2024
For people who don't understand Marathi, he said – Accha hua ball Surya ke haath main baitha warna main usko bitha deta 🤣🤣🤣 pic.twitter.com/0wCaetifXX
हेही वाचा – “तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम फोन कॉल होता”, राहुल द्रविडच्या यशात रोहितचा वाटा, पाहा व्हिडिओ
…रोहितचा विधानभवनात षटकार!
सूर्याने आपल्या भाषणात कॅचचा उल्लेख करताना ‘हातात बॉल बसला’ असं म्हणाला. यानंतर रोहितने भाषण केले. रोहित आपल्या भाषणात म्हणाला, ”बरं झालं बॉल बसला, नाहीतर पुढे मी त्याला बसवला असता.” रोहितच्या या वाक्यानंतर भवनात हशा पिकला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते हसू लागले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा