2024 मध्ये प्रॉपर्टीच्या किमती वाढणार, मुंबईत प्रति स्क्वेअर फूटचा भाव ‘इतका’ होणार!

WhatsApp Group

प्रॉपर्टीच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत, 10 वर्षांपूर्वी जो फ्लॅट किंवा प्लॉट 250 रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने मिळत होता, त्याची किंमत आता 2000 ते 2500 रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे, म्हणजेच किमती 10 पटीने वाढल्या आहेत. कोरोनाच्या कालावधीनंतर रिअल इस्टेट मार्केटमध्ये आणखी वाढ झाली आहे. अशा स्थितीत यंदाही (Real estate In 2024) भाववाढ कायम राहणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित विविध अहवालांतून असे दिसून आले आहे, की 2023 मध्ये देशातील प्रमुख महानगरांमध्ये मालमत्तेच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, जास्त व्याजदरामुळे विक्री तेवढी वाढली नाही. 50 लाखांपेक्षा कमी बजेट असलेल्या घरांच्या विक्रीत घट झाली आहे, तर प्रिमियम विभागातील मालमत्तांच्या किमती मजबूत मागणीसह वाढल्या आहेत.

रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते, गतवर्ष हे सुपर-लक्झरी हाउसिंग मार्केटचे होते. किंमत आणि मागणी या दोन्हींनी अभूतपूर्व पातळी गाठली. निवडक प्रकल्पांच्या किंमती सुमारे 1.5 लाख रुपये प्रति चौरस फूट होत्या. 2024 मध्ये सुपर-लक्झरी मालमत्तांची मागणी कायम राहील आणि मुंबईसारख्या महानगरात 2 लाख रुपये प्रति चौरस फूट या नवीन विक्रमी घरांची किंमत दिसेल. कमी उत्पन्न असलेल्या लोकांना या किमती विचित्र वाटू शकतात.

हेही वाचा – RTI दाखल करण्याची ऑनलाइन प्रोसेस, आता घरबसल्या मिळवा सरकारी विभागाची माहिती

दरम्यान, रिअल इस्टेट रिसर्च आणि कन्सल्टिंग फर्मचे संस्थापक प्रदीप मिश्रा म्हणाले, “आलिशान अपार्टमेंट्सचा ट्रेंड यावर्षीही कायम राहील. मात्र, सार्वत्रिक निवडणुकीच्या आसपास मालमत्तेच्या किमती स्थिर राहू शकतात. निवडणुकीनंतरच बाजाराला नवी दिशा मिळेल.”

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, अब्जाधीश उद्योगपती तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचे घर आहे, त्यामुळे मुंबईतील मालमत्तेला नेहमीच मागणी असते. घर घेणे असो की भाड्याने घेणे, दोन्ही मुंबईत खूप महागडे सौदे आहेत. मुंबईत सी-फेसिंग प्रॉपर्टीजची किंमत खूप जास्त आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment