रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याची बातमी खोटी! स्वत: पोस्ट करत सांगितले, की….

WhatsApp Group

Ratan Tata Hospitalised News : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त समोर आले होते. सोमवारी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यांचा रक्तदाब बराच कमी झाला होता अशी बातमी वृत्तांमध्ये झळकत होती. मात्र टाटांनी सोशल मीडिया हँडलवर हे वृत्त निराधार असल्याचे सांगितले आहे.

टाटांची पोस्ट

माझ्या प्रकृतीबाबत समोर आलेले वृत्त निराधार आहे, माझ्या वयानुसार मी मेडिकल चेक-अपसाठी रुग्णालयात गेलो. चिंता करण्याचे काहीही कारण नाही. लोकांनी आणि मीडियाचे चुकीची माहिती देऊ नये, ही विनंती करतो, असे टाटांनी केलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे.

काय होतं बातमीत?

ब्रीच कँडी हॉस्पिटलशी संबंधित सूत्रांनी पुष्टी केली की रतन टाटा यांना सकाळी 12.30 ते 1.00 दरम्यान रुग्णालयात नेण्यात आले. प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शारुख अस्पी गोलवाला यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, असे समोर आले होते.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment