रणवीर सिंहचं न्यूड फोटोशूट कुठं झालं? कुणी केलं? किती तास लागले?

WhatsApp Group

मुंबई : बॉलिवूडचा स्टार अभिनेता रणवीर सिंह आणि त्याचं सध्याचं न्यूड फोटोशूट प्रचंड चर्चेत आहे. बॉलिवूडच्या ‘बाबा’च्या या फोटोशूटची सर्वत्र चर्चा आहे. कपड्यांशिवाय फोटो क्लिक केल्यानंतर एवढा गदारोळ होईल, असा कदाचित खुद्द रणवीर सिंहनंही विचार केला नसेल. हे फोटोशूट त्यानं पेपर मॅगझिनसाठी केलं आहे. पण आता प्रश्न असा आहे की हे फोटो कुठं शूट केलं गेलं, कुणी शूट केलं, ते कधी झालं आणि किती दिवसात पूर्ण झालं?

कुणी काढले फोटो?

या फोटोशूटसाठी रणवीर सिंह परदेशात गेला होता का? त्याचे हे फोटो कोणत्या फोटोग्राफरनं क्लिक केले? रणवीर सिंहला कपड्यांशिवाय कॅमेरात कैद करणारा फोटोग्राफर कोण? तुमच्याही मनात हे सर्व प्रश्न असतील तर. या सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळतील. रणवीरचे न्यूड फोटो फोटोग्राफर आशिष शाहनं क्लिक केले आहेत.

असे फोटो काढायचं कुणी ठरवलं?

या संपूर्ण फोटोशूटचा किस्सा आशिष शाह यांच्याशी संवाद साधताना जाणून घेतला. त्यानं सांगितलं की रणवीरचं हे शूट करण्यासाठी त्याला सुमारे तीन तास लागले. असे फोटो क्लिक करण्याची कल्पना कोणाची होती, असं विचारल्यावर शाह म्हणाला, हा माझा आणि रणवीर सिंगचा निर्णय आहे. तो एक विशिष्ट बॉडी शेपमध्ये असायला हवा होता आणि मला त्याला वेगळ्या पोझिशनमध्ये दाखवायचं होतं म्हणून हे शूटींग डिमांडिंग होतं.

रणवीरनं त्याला आवश्यक असलेल्या शारीरिक स्वरूपाशी कसं जुळवून घेतले? या प्रश्नाला उत्तर देताना आशिष शाह म्हणाला, ”मला वाटत नाही की त्याला त्याच्या बाजूनं कोणत्याही मोठ्या शारीरिक बदलाची गरज आहे, कारण तो जवळजवळ नेहमीच आकारात असतो. तुम्हाला आठवत असेल तर पेपर मॅगझिननं फेमस किम कार्दशियनचे फोटो काढले. त्या फोटोशूटसाठी त्यांनी माझाही समावेश केला होता. मी याआधीही त्यांच्यासोबत काम केलं आहे पण रणवीरसोबत माझी ती पहिलीच भेट होती.”

हे फोटोशूट कुठं झालं?

फोटोग्राफर आशिष शाहनं सांगितलं, की हे शूट परदेशात नाही तर मुंबईतील वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये केलं आहे. यासाठी रणवीरला कसलीही लाज वाटली नाही. या शूटसाठीही त्यानं चांगली कामगिरी केली. जसे लोक त्यांचे फोटो पाहण्यास उत्सुक आहेत, पण रणवीरला हे फोटो तिथे पाहता आले नाहीत. कारण त्याने हे फोटो फिल्म कॅमेऱ्यातून काढले होते आणि त्यामुळंच त्याला तिथे हे फोटो पाहता आले नाहीत.

रणवीर सिंहचं न्यूड फोटोशूट पाहिल्यानंतर लोक त्याला ट्रोल करत आहेत. ”मी काय परिधान करावं आणि काय नाही हे मी स्वतः निवडू शकतो. लोकांचे काम फक्त बोलणं असून त्यामुळं मला काहीही फरक पडत नाही, असं रणवीरनं स्पष्टपणं सांगितलं.

Leave a comment