

Ramdas Athawale On MNS : शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे यांच्यातील जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. नुकतेच शिवतीर्थावर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिघेही एकत्र दिसले. तेव्हापासून महाराष्ट्रात शिंदे गट-भाजप-मनसे अशी नवी युती होण्याची चर्चा जोर धरू लागली होती.
यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मोठं विधान करून राज्यात नव्या युतीच्या अटकळांना खतपाणी घातले आहे. मात्र आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत धक्कादायक विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या कार्यक्रमाला गेले होते, मात्र तरीही राज ठाकरे एनडीएमध्ये सामील होणार नसल्याचे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले.
हेही वाचा – Bhaubeej 2022 : भाऊबीज उद्या की परवा? ‘इथं’ दूर करा कन्फ्युजन!
#ShubhDipawali#HappyDiwali
#शिवाजीपार्कदीपोत्सव #ShivajiParkDipotsav#महाराष्ट्रनवनिर्माणसेना pic.twitter.com/A80PhKEOF3— Raj Thackeray (@RajThackeray) October 21, 2022
काय म्हणाले आठवले?
आठवले म्हणाले, ”तशीही आम्हाला मनसेची गरज नाही. मुंबई महापालिकेवर (BMC) आरपीआय, भाजप आणि शिंदे गटाचा झेंडा फडकणार आहे. त्यामुळे आमच्या महाआघाडीत राज ठाकरेंची गरज नाही.” शिंदे आणि फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत मनसेने आयोजित केलेल्या दिवाळी कार्यक्रमात हजेरी लावली. मनसेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीस यांचा सहभाग हे मुंबईतील लोकसभा निवडणुकीपूर्वी संभाव्य राजकीय युतीचे संकेत असल्याचे बोलले जात आहे. ‘दीपोत्सव’ कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः या दोन्ही नेत्यांचे स्वागत केले होते.