Grampanchayat Election : मनसेनं उघडलं खातं..! ‘या’ ठिकाणी मारलं मैदान; ९ पैकी ६ सदस्य विजयी

WhatsApp Group

Grampanchayat Election : महाराष्ट्रातील १ हजार ७९ ग्रामपंचायतींवर कुणाचा झेंडा फडकणार याचा निर्णय आज होणार आहे. १८ जिल्ह्यातील ११६६ ग्रामपंचायतींपैकी ८७ जागा बिनविरोध निवडून आल्यात. त्यामुळे १०७९ जागांसाठी काल मतदान पार पडले. याच निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. अशात मनसे पक्षासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मनसेने आपले पहिले खाते उघडले आहे.

भिवंडी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने आपले खाते उघडले आहे. भिवंडीतील शिरोळे ग्रामपंचायतीवर मनसेने बाजी मारली. येथील नऊ पैकी सहा जागेवर मनसेने आपला झेंडा रोवला. तर, सरपंचही मनसेचा निवडून आला आहे. राज्यात शिंदे-भाजपाचे सरकार स्थापन झालं आहे. त्यानंतर आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहे. या निवडणुकीचा निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – Andheri East Bypoll Election : करोडपती मुरजी पटेलांची संपत्ती, शिक्षण, फ्लॅट, जमीन किती?

या निवडणूकीत नाना पटोले, विजयकुमार गावित, के.सी.पाडवी, उदय सामंत, राजन साळवी, भास्कर जाधव, रामदास कदम, परिणय फुके, कपिल पाटील यांच्यासह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Leave a comment