Nanded Hospital Deaths : नांदेडमधील घटनेवर राज ठाकरे काय बोलले?

WhatsApp Group

Raj Thackeray on Nanded Hospital Deaths In Marathi : महाराष्ट्रातील नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचा आकडा वाढला आहे. सोमवारी 24 मृत्यू झाल्यानंतर आजही 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशाप्रकारे नांदेडच्या रुग्णालयात जीव गमावणाऱ्यांची संख्या आता 31 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजी नगरच्या घाटी हॉस्पिटलमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. गेल्या 24 तासांत या रुग्णालयात 2 नवजात बालकांसह 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्य सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याशिवाय मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray Lates News In Marathi) यांनीही टीका केली आहे.

राज ठाकरे म्हणाले, ”नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या 24 तासात 24 मृत्यू (Raj Thackeray on Nanded Hospital Deaths) झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ? दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं.”

हेही वाचा – India Monsoon 2023 : यंदा गेल्या 5 वर्षातील सर्वात कमी पाऊस! शेती करणं अवघड

नांदेडच्या या रुग्णालयात (Nanded Hospital Deaths Update) गेल्या 24 तासांत 24 जणांना जीव गमवावा लागला असून त्यात 12 बालकांचा समावेश आहे. आता आणखी 7 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 4 मुलांचा समावेश आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे या लोकांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर श्यामराव वाकोडे यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि औषधांचा तुटवडा यामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याचेही ते म्हणाले. तपासासाठी तीन सदस्यीय पथक तयार करण्यात आले असून त्यांना मंगळवारपर्यंत अहवाल सादर करायचा आहे, असे सांगण्यात आले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment