Mumbai Rain : तब्बल महिनाभराच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मुंबईत गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 24 तासांत शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सकाळपासून शहरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवरील वाहनांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला.
पावसामुळे वाहतूक मंदावली असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. बराचवेळ पडलेल्या पावसामुळे रस्ते निसरडे झाले असून, ब्रेक लावल्याने दुचाकी व चारचाकी वाहने घसरल्याच्या घटना घडल्याचे वाहनधारकांनी सांगितले.
हेही वाचा – आता आपल्या आवाजाने करता येणार UPI पेमेंट! NPCI कडून नवीन सुविधा
गेल्या 24 तासात सकाळी 8 वाजेपर्यंत, शहरात 8.11 मिमी, पूर्व उपनगरात 15.87 मिमी आणि पश्चिम उपनगरात 12.45 मिमी पावसाची नोंद झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अरबी समुद्रात 4.43 वाजता 3.05 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मुसळधार पावसासह उंच लाटांमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!