‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींनी घातला ४१,२५७ रुपयांचा टी-शर्ट? काँग्रेस म्हणालं, “मोदीजींचा…”

WhatsApp Group

Rahul Gandhi T Shirt Controversy : केंद्रातील सत्तेपासून ८ वर्षे दूर राहिल्यानंतर काँग्रेसला आता राजकीय मैदान मजबूत करायचं असेल, तर रस्त्यावर उतरावे लागेल, याची जाणीव झाली आहे. त्यामुळं पक्ष ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो यात्रे’वर आहे. काँग्रेस याला व्यापक जनसंपर्क अभियान म्हणत आहे. हा प्रवास एकूण ३५७० किलोमीटरचा आहे. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची एक वेगळीच शैली पाहायला मिळाली. कुर्ता पायजमा ऐवजी ते टी-शर्ट आणि पँटमध्ये दिसले. पण लोकांचं लक्ष त्यांच्या बुटांकडं होतं. पण आता भाजपनं त्यांच्या टी-शर्टची किंमत सांगून नवा वाद सुरू केला आहे.

टी-शर्टची किंमत किती?

भाजपनं आपल्या ट्विटर हँडलवरून राहुल गांधींचा टी-शर्ट परिधान केलेला एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष कोणत्या कंपनीचा आणि किती टी-शर्ट घालतात हे सांगण्यात आलं आहे. भाजपच्या पोस्टनुसार, राहुल गांधी यांनी ब्रिटिश लक्झरी फॅशन ब्रँड बर्बेरीचा पोलो टी-शर्ट घातला असून, त्याची किंमत ४१ हजार २५७ रुपये आहे. यासोबतच भाजपनं टोमणा मारत लिहिलं आहे की, ‘भारत देखो!’ आता या घटनेवरून नवा वाद सुरू झाला आहे.

हेही वाचा – VIDEO : खुळचट कुठले..! राणीच्या मृत्यूनंतर बकिंघम पॅलेसबाहेर कपलचं ‘असं’ कृत्य; एकदा बघाच!

काँग्रेसचं उत्तर

नंतर काँग्रेसनंही भाजपची ही पोस्ट शेअर करत प्रत्युत्तर दिले. ”अरे…भारत जोडो यात्रेत जमलेली गर्दी पाहून घाबरलात का? या विषयावर बोला… बेरोजगारी आणि महागाईवर बोला. उरलेल्या कपड्यांबद्दल चर्चा करायची असेल तर मोदीजींचा १० लाखांचा सूट आणि दीड लाखाचा चष्मा याबद्दल बोलू. सांगा करायची का चर्चा?”, असं काँग्रेसनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं.

 

 

हेही वाचा – विश्वविजेत्या कॅप्टनची निवृत्ती..! टी-२० वर्ल्डकपपूर्वी घेतला धक्कादायक निर्णय

भारत जोडो यात्रा

७ सप्टेंबर रोजी राहुल गांधी तामिळनाडूतील श्रीपेरंबदूर शहरात पोहोचले. येथे कांचीपुरम येथे त्यांनी वडील राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळी प्रार्थना सभेला हजेरी लावली होती. पुढे त्यांनी येथून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केली. काँग्रेसची भारत जोडो यात्रा १५० दिवस चालणार आहे. ही यात्रा तामिळनाडूमधील कन्याकुमारीपासून सुरू होईल आणि जम्मू-काश्मीरपर्यंत ३५७० किमी असेल.

Leave a comment