Pune Zika Virus : पुणे शहरातील झिका रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे. आतापर्यंत झिकाची लागण झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या मृत्यूंची चौकशी करणार आहे. यावरून त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल.
शहरातील झिकाचे सर्वाधिक 11 रुग्ण एरंडवणे क्षेत्रीय कार्यालय परिसरात आढळून आले आहेत. त्याखाली डहाणूकर कॉलनी क्षेत्रीय कार्यालय परिसरात 10, खराडी 6, पाषाण 5, मुंढवा, सुखसागर नगर 4-4, आंबेगाव बुद्रुक, घोले रोड 3-3, कळस 2, धनकवडी, लोहेगाव, ढोले-पाटील रोड, वानवडी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी कोथरूडमधील गुजरात कॉलनी, खराडीतील शिवाजी चौक आणि सेनापती बापट रोडवरील मंगलवाडी येथे तीन नवीन रुग्ण आढळून आले.
हेही वाचा – DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ₹ 1,00,170 चा मोठा फायदा, वाचा!
कोथरूड येथील गुजरात कॉलनी येथील 68 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याचा झिका चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अथश्री सोसायटी, बाणेर येथील 78 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
एरंडवणे येथील 76 वर्षीय रुग्ण आणि खराडी येथील 72 वर्षीय रुग्ण या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांना सहविकार असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा झिका चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!