Tomato : शेअर बाजारातील शेअर्समधून चांगली कमाई करता येते. दुसरीकडे, जर पैसे चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवले गेले तर परतावा मिळण्याची शक्यता देखील खूप वाढते. त्याच वेळी, स्टॉक मार्केटमध्ये अनेक मल्टीबॅगर स्टॉक आहेत, ज्यांनी वेळोवेळी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. मात्र, आज शेअर्सवर न बोलता भाजीपाल्याची चर्चा करणार आहोत, ज्याने महिनाभरात शेतकऱ्यांना चांगला रिटर्न दिला असून त्याचे नाव आहे टोमॅटो. टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला, पण शेतकऱ्यांचे खिसे भरले.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने टॉमटो विकून चांगलेच पैसे कमावले आहेत. सर्व आव्हानांवर मात करत पुण्यातील या शेतकऱ्याने गेल्या महिनाभरात टोमॅटोचे पीक विकून 3 कोटी रुपये कमावले आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पाचघर गावातील ईश्वर गायकर (36) या शेतकऱ्याला यावर्षी मे महिन्यात कमी भावामुळे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात पीक फेकून द्यावे लागले.
हेही वाचा – Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 ग्रॅमसाठी मोजा ‘इतके’ रुपये!
करोडपती शेतकरी
शेतकऱ्याने अविचल जिद्द दाखवत आपल्या 12 एकर शेतात टोमॅटोची लागवड केली. आता टोमॅटोचे गगनाला भिडलेले भाव असताना गायकर यांच्या मेहनतीचे फळ मिळाले असून ते करोडपती झाले आहेत. गायकर यांचा दावा आहे की त्यांनी 11 जून ते 18 जुलै दरम्यान टोमॅटोचे उत्पादन विकून 3 कोटी रुपये कमावले आहेत.
उत्तम कमाई
“या कालावधीत, त्यांनी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) येथे 18,000 क्रेट टोमॅटो (प्रत्येक क्रेटमध्ये 20 किलो टोमॅटो) 3 कोटी रुपयांना विकले आहेत. उर्वरित 4,000 क्रेट टोमॅटो विकून सुमारे 50 लाख रुपये कमावण्याचा त्यांचा मानस आहे. टोमॅटोची लागवड आणि वाहतुकीवर एकूण 40 लाख रुपये खर्च झाल्याचे गायकर यांनी सांगितले.
टोमॅटो शेती
ते म्हणाले, ”माझ्याकडे 18 एकर जमीन आहे. यापैकी मी 12 एकरात टोमॅटोची लागवड केली. 11 जूनपासून मी टोमॅटोचे 18,000 क्रेट विकून 3 कोटी रुपये कमावले आहेत.” गायकर यांनी 11 जून रोजी टोमॅटोची विक्री 770 रुपये प्रति क्रेट (37 ते 38 रुपये प्रति किलो) केली. 18 जुलै रोजी त्यांना 2,200 रुपये प्रति क्रेट (110 रुपये प्रति किलो) भाव मिळाला.
दुसरे शेतकरी राजू महाले यांनीही चालू हंगामात अडीच हजार क्रेट टोमॅटोची विक्री करून 20 लाख रुपये कमावले आहेत. नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी अक्षय सोलाट यांनी गायकर यांचा शेतमाल खरेदी केला आहे. सोलाट म्हणाले की, सध्या टोमॅटोची बाजारपेठ तेजीत आहे. त्यांनी टोमॅटोची खरेदी 2400 रुपये प्रति क्रेट दराने केली. ते म्हणाले, “मी गेल्या 15 वर्षांपासून या व्यवसायात आहे. पण टोमॅटोमध्ये एवढी तेजी यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नव्हती.”
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!