मराठा आरक्षण : आज पुणे बंदची हाक, जाणून घ्या काय सुरु राहील आणि काय बंद!

WhatsApp Group

Pune Bandh : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पूर्णपणे तापला आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) संदर्भात उठलेली मागणी हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे विविध शहरात बंदची घोषणा करण्यात आली. कल्याण शहरानंतर आता गुरुवारी पुणे शहरात बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते दुकानदार आणि रिक्षाचालकांसह इतर सार्वजनिक सेवा पुरवठादारांनाही बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहेत. पुण्यातील विविध भागात मोर्चाने हा बंद पुकारला आहे. औंध, बाणेर, बालेवाडी, बोपोडी, पाषाण, सोमेश्वर वाडी, सुतार वाडी, महाळुंगे, सुस या भागात विशेष आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – आयफोन 15 आणि आयफोन 14 मध्ये फरक काय? दोन्ही महागच, तरीही….

या महिन्याच्या सुरुवातीला जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे डझनभर पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. नुकत्याच झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या विरोधातही हा बंद पुकारण्यात आला आहे. या बंदनंतर काय खुले राहणार आणि काय बंद राहणार, याची चिंता पुणेकरांना लागली आहे. या बंदमुळे काय परिणाम होईल आणि बंद भागात काय खुले राहतील हे जाणून घ्या.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मराठा क्रांती मोर्चाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बंद व्यापारी आणि दुकानदारांवर लादण्यात आलेला नाही. काही व्यापारी, दुकानदार आणि आस्थापनांनी एकदिवसीय बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय काही शाळा आणि शैक्षणिक संस्थांनीही बंदला पाठिंबा देत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पुणे बंद दरम्यान रुग्णालये आणि इतर अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही, यासाठीही प्रयत्न केले जातील.

PMPML द्वारे पुरविल्या जाणार्‍या सार्वजनिक वाहतूक सेवा नेहमीप्रमाणे चालतील. तर Ola आणि Uber इत्यादी ऑटो आणि टॅक्सी एग्रीगेटर्सच्या सेवा सामान्यपणे चालतील.

जाणून घ्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले. महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या 32 टक्क्यांहून अधिक आहे. राज्य सरकारने या समाजाला नोकऱ्यांसह अनेक क्षेत्रात 16 टक्के आरक्षण दिले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले. याच अनुषंगाने राज्यातील विविध मराठी समाजांनी आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू केले होते. आंदोलनादरम्यान जमावाने हिंसक भूमिका घेतली होती. ते पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्जही केला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment