गोरेगावमध्ये PMAY च्या घरांच्या किमती वाढल्या, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून किंमत निश्चित

WhatsApp Group

Mumbai : म्हाडाच्या मुंबई विभागातील पहाडी गोरेगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या किमतीत 1.92 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये या योजनेतील घर 30 लाख 44 हजार रुपयांना विकले गेले. आता या घरांसाठी पात्र विजेत्यांना 32 लाख 36 हजार रुपये भरावे लागणार आहेत. मुंबई विभागातील पहाडी गोरेगाव येथील गृहनिर्माण प्रकल्पातील अंदाजे 1,900 घरे PMAY योजनेत समाविष्ट आहेत.

या घरांसाठी ऑगस्ट 2023 मध्ये लॉटरी लागली होती. PMAY योजनेनुसार, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 3 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. या घरांना अर्जदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु आर्थिक किंवा इतर कारणांमुळे, PMAY मधील 88 घरे विजेत्यांनी परत केली आहेत. ती रिक्त राहिल्याने, ही घरे आता आगामी 2024 च्या सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. मात्र यावेळी या घरांच्या किमती वाढल्या आहेत.

हेही वाचा – India’s First Vande Metro : भारताची पहिली ‘वंदे मेट्रो’ धावण्यासाठी सज्ज! जाणून घ्या भाडे, रूट…

PMAY मध्ये 88 घरांचा समावेश केल्यानंतर त्यांच्या किमती निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार या किमतीत अडीच लाख रुपयांची वाढ करून 33 लाख 02 हजार रुपये करण्यात आली. एकूणच घरांच्या किमतीत 2 लाख 52 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. लोकसत्ताने 2 जुलै रोजी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

भाववाढीमुळे इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता मुंबई मंडळाने अखेर किंमत कमी केली आहे. या घराची किंमत 56 हजार रुपयांनी कमी करण्यात आली असून आता या घराची किंमत 32 लाख 36 हजार रुपये निश्चित करण्यात आल्याची माहिती मुंबई बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. नियमानुसार व्याजदर लागू करून किंमती ठरवल्या जातात. त्यानुसार 1 लाख 92 हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment