देशातील ७५ डिजिटल बँकिंग युनिट्सचं PM मोदींच्या हस्ते लोकार्पण!

WhatsApp Group

PM Modi Inaugurated Digital Banking Units :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशातील ७५ डिजिटल बँकींग युनिटची स्थापना करण्यात आली असून यामध्ये सातारा येथील बँक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश आहे. डिजीटल कार्यप्रणालीचे लोकार्पण दूरदृष्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामण उपस्थित होत्या. तर पायोनिर टॉवर, सातारा येथून खासदार धनंजय महाडीक, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एस. राजीव, अंचल प्रबंधक विवेक नाचणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिजीटल बँकेतील अधिकारी हे ग्राहकांना डिजिटल व्यवहार कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये ग्राहकांना अनेक सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच वित्तीय साक्षरता, डिजीटल व्यवहार, ऑनलाईन फसवणूक होणार नाही याचेही ग्राहकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांच्या शंकांचेही निरासण करण्यात येणार आहे.

हेही वाचा – चंद्रकांत पाटलांची घोषणा..! प्रत्येक गावात ग्रंथालय सुरू करणार; वाचा सविस्तर!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ जिल्हृयातील ७५ डिजिटल बँक करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद तसेच सातारा येथील बॅक ऑफ महाराष्ट्रचा समावेश आहे. या डिजिटील बँकींगमुळे आर्थिक सक्षमीकरणाला चालना, डिजिटल बँकीग साक्षरता होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात औरंगाबाद आणि सातारा येथे ऑनलाइन डिजिटल बँक सुरू करण्यात आली. शहरातील अग्रगण्य बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने शहरात डिजिटल बँक सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. औरंगाबाद शहरातील जवाहरनगर भागात चेतक घोडाजवळ पहिली डिजिटल बँक सुरू करण्यात आली. त्याचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते झाले.

Leave a comment