मोदी सोलापुरात इमोशनल, भाषणही थांबवलं, व्हिडिओ व्हायरल!

WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात पोहोचले. जिथे त्यांनी हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची भेट दिली. सोलापुरात मोदींनी विकास प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी जनतेला संबोधितही केले. भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी भावूक (PM Modi Emotional In Solapur) झाले. पीएम मोदी म्हणाले, ”अटल आवास योजनेंतर्गत बांधलेली घरे पाहिल्यानंतर मलाही वाटले की, मलाही माझ्या लहानपणी अशा घरात राहता आले असते.”

मोदी इतके भावूक झाले की त्यांनी काही वेळ भाषण थांबवले आणि पाणी पिण्यास सुरुवात केली. हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, चिंध्या वेचणारे, विडी कामगार, वाहनचालक अशा लाभार्थ्यांना पीएमएवाय-अर्बन योजनेअंतर्गत तयार केलेल्या घरांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले.

मोदी म्हणाले, की ”बर्‍याच काळापासून आपल्या देशात गरिबी हटावचा नारा दिला जात होता, पण गरिबी हटली नाही. गरिबांच्या नावावर योजना केल्या, पण त्याचा लाभ गरिबांना मिळाला नाही. मध्यस्थ त्यांच्या हक्काचे पैसे लुटायचे. याआधीच्या सरकारांची धोरणे, हेतू आणि सचोटी चव्हाट्यावर आली होती. 2014 मध्ये सरकार स्थापन होताच मी म्हटले होते, माझे सरकार गरिबांना समर्पित सरकार आहे. त्यामुळे गरिबांच्या अडचणी कमी होऊन त्यांचे जीवन सुसह्य होईल अशा योजना आम्ही एकापाठोपाठ एक राबवल्या.”

हेही वाचा – मुद्रांक शुल्क अभय योजना : व्याप्ती, मिळणारी सूट व अर्ज करावयाची पद्धती

याशिवाय पीएम मोदी म्हणाले की, ‘भगवान श्री राम हे आमच्यासाठी समर्पित आणि वचनबद्ध राहण्याची सर्वात मोठी प्रेरणा आहेत. सोलापूरच्या हजारो गोरगरीबांसाठी आम्ही जी प्रतिज्ञा घेतली होती ती आज पूर्ण होत आहे याचा मला आनंद आहे. आज पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे उद्घाटन करण्यात आले. हा खरोखर आपल्या सर्वांसाठी एक खास क्षण आहे. आमचे सरकार पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत आहे की, श्रीरामाच्या आदर्शांवर अनुसरून देशात चांगले प्रशासन व्हावे आणि देशात प्रामाणिकपणाचे राज्य व्हावे. सर्वांच्या पाठिंब्याने, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास आणि प्रत्येकाच्या प्रयत्नाला प्रेरणा देणारे हे रामराज्य आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment