INS विक्रांत देशसेवेत दाखल..! पंतप्रधान मोदी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांना…”

WhatsApp Group

Indias First Indigenous Aircraft Carrier INS Vikrant : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी (२ सप्टेंबर) देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत नौदलाकडं सुपूर्द केली. त्यांनी नवीन नौदल ध्वजाचं अनावरणही केलं. त्यावर पूर्वी गुलामगिरीचे प्रतीक होतं, ते आम्ही काढून टाकलं आहे, असं मोदींनी सांगितलं. नवीन नौदल ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित आहे. भारतीय नौदलाच्या झेंड्यावरून आता ब्रिटीश राज हटवलं गेलं आहे. याआधीच्या भारतीय नौदलाच्या झेंड्यावर सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होतं. हे हटवून आता झेंड्यावर नांगर असणारं भारतीय नौदलाचं चिन्ह आहे. मोदी म्हणाले, आयएनएस विक्रांत ही केवळ युद्धनौका नसून ती समुद्रात तरंगणारं शहर आहे.

मोदी सकाळी ९.३० वाजता कोचीच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये पोहोचले होते. येथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या महत्त्वाच्या घटनेप्रसंगी  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन उपस्थित होते.

मोदींच्या भाषणातील ३ महत्त्वाचे मुद्दे

सशक्त भारताचे हे शक्तिशाली चित्र

पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. हे भारताच्या प्रतिभेचं उदाहरण आहे. हे बलशाली भारताचं शक्तिशाली चित्र आहे. हे अमृत महोत्सवाचे अतुलनीय अमृत आहे. हे सांगते की जर तुम्ही दृढनिश्चयी असाल तर काहीही अशक्य नाही. आज आपण नवीन सूर्याचा उदय पाहत आहोत. त्यातून निर्माण होणारी वीज ५ हजार घरांना प्रकाश देऊ शकते. दोन फुटबॉल मैदानांएवढं याचा आकार आहे.”

हेही वाचा – भारी बातमी..! पुण्यात शिकलेला माणूस ‘स्टारबक्स’ कंपनीचा CEO झालाय; नक्की वाचा!

नवीन नौदलाचा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित

मोदी म्हणाले, शिवरायांच्या सागरी शक्तीनं शत्रू थरथरत होते. आज मी छत्रपती वीर शिवाजी महाराजांना नौदलाचा नवीन ध्वज अर्पण करतो. हा नवीन ध्वज नौदलाची ताकद आणि स्वाभिमान मजबूत करेल. आतापर्यंत नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीचे चित्र होते. आम्ही हे चित्र काढले आहे.

INS विक्रांतनं भारतामध्ये नवीन आत्मविश्वास..

मोदी म्हणाले, ”विक्रांत मोठं आहे, विशेष आहे, अभिमानास्पद आहे. ती केवळ युद्धनौका नाही. एकविसाव्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, कौशल्य आणि परिश्रमाची ती साक्ष आहे. आज भारत अशा देशांच्या यादीत सामील झाला आहे जे त्यांच्या तंत्रज्ञानाने एवढी मोठी जहाजे बनवू शकतात. आज आयएनएस विक्रांतने भारतीयांमध्ये नवा आत्मविश्वास भरला आहे.”

INS विक्रांतचा २५ वर्षांनंतर पुनर्जन्म

INS विक्रांत ३१ जानेवारी १९९७ रोजी नौदलातून निवृत्त झाली. आता जवळपास २५ वर्षांनंतर विक्रांतचा पुन्हा एकदा पुनर्जन्म होत आहे. १९७१ च्या युद्धात, INS विक्रांतनं आपल्या सीहॉक लढाऊ विमानांनी बांगलादेशातील चितगाव, कॉक्सबाजार आणि खुलना येथे शत्रूची जागा नष्ट केली होती. विक्रांत ही देशातील सर्वात मोठी युद्धनौका आहे. ही विमानवाहू नौका २० मिग-२९ लढाऊ विमानं वाहून नेण्यास सक्षम आहे. त्याची किंमत सुमारे २० हजार कोटी रुपये आहे.

विक्रांत ही ४० हजार टन वजनाची विमानवाहू नौका आहे. जगातील फक्त अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांकडे ४० हजार आणि त्याहून अधिक वजनाची विमानवाहू जहाजे तयार करण्याची क्षमता आहे. विक्रांत दहा हेलिकॉप्टर वाहून नेण्यासही सक्षम आहे. २०१७ मध्ये INS विराटच्या निवृत्तीनंतर भारताकडं फक्त INS विक्रमादित्य ही एक विमानवाहू युद्धनौका आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment