PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये दिले जातात. या सगळ्यात काही चुका अशा आहेत ज्या शेतकऱ्यांनी केल्या तर त्यांना मिळणारा हप्ता अडकू शकतो.
या चुका अजिबात करू नका! (PM Kisan Yojana)
पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना नाव, लिंग, आधार क्रमांक, पत्ता आणि इतर माहितीबाबत चुकीची माहिती देऊ नका. तुम्ही असे केल्यास, तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता. तसेच तुमच्या बँक खात्याबाबत चुकीची माहिती देऊ नका. तुमचा खाते क्रमांक किंवा इतर कोणतीही माहिती चुकीची असली तरीही तुम्ही हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता. त्यामुळे तुमची माहिती एकदा काळजीपूर्वक तपासा.
ई-केवायसी (PM Kisan Yojana)
जर तुम्ही ई-केवायसी केले नाही, तर तुम्ही हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता. नियमांनुसार, योजनेशी संबंधित प्रत्येक लाभार्थीसाठी हे आवश्यक आहे. म्हणून, तुम्ही अधिकृत शेतकरी पोर्टल pmkisan.gov.in वर भेट देऊन, तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन किंवा बँकेत जाऊन ते पूर्ण करू शकता.
हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : “माल-पाणी मिळणार नाही, मतदान करायचं तर करा…”, नितीन गडकरींचा अजेंडा!
चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाई (PM Kisan Yojana)
दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधीचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांविरोधात सरकारने कारवाई तीव्र केली असल्याची बातमी येत आहे. जमिनीच्या नोंदींच्या पडताळणीदरम्यान, पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र लोकांकडून पैसे काढण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे. पैसे परत न झाल्यास अशा लोकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
येथे संपर्क करा (PM Kisan Yojana)
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!