Seat Belt Penalty : टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आतापासून कारमधील प्रत्येकाला सीट बेल्ट लावावा लागणार आहे. तुम्ही पुढच्या सीटवर बसलात किंवा मागे, प्रत्येकाला सीट बेल्ट घालणं बंधनकारक असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी याबाबत ही माहिती दिली आहे. मोठी गोष्ट म्हणजे ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट न लावल्याबद्दलही १००० रुपयांचं चलन कापलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मागे बसलेल्या प्रवाशांमा बेल्ट लावण्यासाठी क्लिपची तरतूद असेल. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नाही, तर अलार्म वाजत राहील, असंही बोललं जात आहे. या संदर्भात येत्या ३ दिवसांत आदेश काढण्यात येणार आहे. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार अपघातात मृत्यू झाला. त्यांची कार मुंबईजवळ दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. प्राथमिक तपासात, अपघाताचं कारण ओव्हरस्पीडिंग आणि चुकीच्या बाजूनं ओव्हरटेक केल्याचं समोर आलं आहे. मागे बसलेल्या सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट घातला नसल्याचंही बोललं जात आहे.
दु:खद बातमी..!
टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचं कार अपघातात निधन#TATA #CyrusMistry #chairman #accident #vachamarathi pic.twitter.com/doJhX8xzCi
— Vacha Marathi (@VachaMarathi) September 4, 2022
Why you should wear seatbelt when sitting the rear seat: pic.twitter.com/92XnNXoW3a
— Porinju Veliyath (@porinju) September 5, 2022
हेही वाचा की – Cyrus Mistry Road Accident : सर्वात घाणेरडे रस्ते भारतात..! दर ४ मिनिटाला एक माणूस मरतोय
आता या सगळ्या गोष्टी पाहता मोदी सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या व्यक्तीनं पूर्वीही सीट बेल्ट लावायचा नियम होता, पण आता मागे बसलेल्या व्यक्तीलाही तो नियम पाळावा लागणार आहे. अशा परिस्थितीत रस्ते अपघात कमी व्हावेत यासाठी अधिक सुरक्षिततेवर भर दिला जात आहे. लोक हा नियम विसरलेले नाहीत, त्यामुळे वाहनातील अलार्म यंत्रणा कार्यान्वित करण्याचंही बोललं जात आहे. गाडीत बसलेल्या कोणत्याही व्यक्तीनं सीट बेल्ट लावला नाही तर अलार्म वाजत राहील, अशा परिस्थितीत लोकांना नियम पाळणं भाग पडेल.
सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांचं नेमकं कशामुळं वाजलं? वाचा इथं!#RatanTata #CyrusMistry #cyrusmistri #CyrusMistryDead #vachamarathi #Tatasons https://t.co/lKJGMuqRKD
— Vacha Marathi (@VachaMarathi) September 4, 2022
गडकरी म्हणाले…
मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या रचनेच्या प्रकारामुळं इथं सातत्यानं अपघात होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ”मागच्या सीटवर सीट बेल्ट लावणं आधीच बंधनकारक आहे, पण लोक त्याचं पालन करत नसून आता दंड आकारण्यात येणार आहे. दंड घेणं हा हेतू नसून जनजागृती करणं आहे. २०२४ पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी करण्याचं लक्ष्य आहे. तसंच भारतात समोरचा प्रवासी आणि ड्रायव्हरसाठी एअरबॅग अनिवार्य आहेत. जानेवारी २०२२ पर्यंत, सरकारनं कंपन्यांना प्रत्येक प्रवासी कारमध्ये प्रत्येकी ८ प्रवासी असलेल्या ६ एअरबॅग असणं बंधनकारक केलं आहे”, असं गडकरी म्हणाले.