Patra Chawl Land Scam : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आणखी एक धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता जो फेटाळण्यात आला आहे. संजय राऊतांच्या जामीन अर्जावर १७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, राऊत यांना १० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १ ऑगस्ट रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती. संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आणि त्यांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. राऊत यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.पुन्हा एकदा त्यांना धक्का बसला आहे.त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून त्यांना आता १७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा – घातपात की अपघात? सांगलीत आईसह तीन मुलींचा मृत्यू; तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या आणि…
Patra Chawl land scam case | Judicial custody of Shiv Sena leader Sanjay Raut extended till 17th October pic.twitter.com/ctSgqEzC3N
— ANI (@ANI) October 10, 2022
संजय राऊत यांनी जामिनासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर २७ सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, न्यायालयाने राऊतांना दिलासा दिला नाही. कोर्टाने जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोंबरपर्यंत पुढे ढकलली होती.