Building Collapsed In Kopar Khairane : महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे काल रात्री एक मोठा अपघात झाला. कोपर खैरणे परिसरातील बोनकोडे गावात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. इमारत कोसळण्याच्या वेळी काही लोकांचे प्राण वाचवण्यात यश आले, तर काही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. बचाव कार्यादरम्यान अग्निशमन दलाला एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. त्याचबरोबर ढिगारा हटवण्याचे कामही सुरू आहे. अनेक लोक गाडले जाण्याची शक्यता आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, अग्निशमन दलाचे अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले की, चार मजली इमारतीत अनेक लोकांचे कुटुंब राहत होते. अपघातापूर्वी ३२ जण जीव मुठीत घेऊन बाहेर पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र इमारत कोसळली तेव्हा ८ जण इमारतीतून बाहेर पडत होते. अग्निशमन दलाने तात्काळ काही जणांची सुटका केली. त्याचवेळी रात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह रविवारी सकाळी बाहेर काढण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. इमारतीतील लोकांना ओळखण्यासाठी बोलावण्यात आले आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे झाले विद्यार्थी..! खुर्ची सोडून बेंचवर बसले; मुलांना म्हणाले…
A four-storey building collapsed on Saturday night in Bonkode village in Kopar Khairane area of Navi Mumbai Rescue operation underway. @NMMConline @SaamanaOnline @Mumbaikhabar9 @Gunheshodh1 @navimumbaicv @navimumbaiplus1 pic.twitter.com/xjDCNAbVFB
— 𝕄𝕣.ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) October 2, 2022
Maharashtra | A four-storey building collapsed at around 10.30pm last night at Bonkode village in Kopar Khairane area of Navi Mumbai pic.twitter.com/nHwMC9NFlN
— ANI (@ANI) October 2, 2022