आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या!

WhatsApp Group

मुंबई : तेलगू देसम पक्षाचे (TDP) संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची मुलगी उमा माहेश्वरी (Uma Maheshwari) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी सीआरपीसी कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

उमा या एनटी रामाराव यांच्या सर्वात लहान कन्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दग्गुबती पुरंदेश्वरी आणि टीडीपी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी त्यांच्या बहिणी आहेत. ही बातमी मिळताच नायडू, त्यांचा मुलगा नारा लोकेश आणि कुटुंबातील इतर सदस्य माहेश्वरी यांच्या घरी पोहोचले.

बेडरूमला पंख्याला लटकलेला मृतदेह..

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमा माहेश्वरी या प्रकृतीच्या काही कारणांमुळं अस्वस्थ होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी त्यांचा मृतदेह बेडरूमच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ज्युबली हिल्स पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून गुन्हा दाखल केला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव उमा नैराश्यात गेल्या असाव्या, त्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललं असावं, असा पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा – ‘वाका-वाका’ गाण्यानं सर्वांना वेड लावणारी शकीरा ८ वर्षांसाठी तुरुंगात जाणार?

१२ भावंडांमध्ये सर्वात लहान उमा

उमा माहेश्वरी एनटी रामाराव यांच्या १२ मुलांपैकी चार बहिणींमध्ये सर्वात लहान होत्या. त्यांचे वडील एनटी रामाराव हे टीडीपीच्या मोठ्या नेत्यांपैकी एक होते.

१९८२मध्ये टीडीपीची स्थापना

अभिनेते-राजकारणी एनटीआर यांनी १९८२मध्ये तेलुगू स्वाभिमानच्या घोषणेवर टीडीपीची स्थापना केली आणि नऊ महिन्यांत पक्षाला सत्तेवर आणून एक प्रकारचा विक्रम केला. त्यामुळं तत्कालीन अविभाजित आंध्र प्रदेशातील काँग्रेसची पक्षीय सत्ता संपुष्टात आली. त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीनंतर सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर काही महिन्यांनी वयाच्या ७२व्या वर्षी १९९६मध्ये त्यांचं निधन झालं. उमा माहेश्वरी यांच्या मुलीच्या लग्नात अनेक कुटुंबीय एकत्र आले होते. अभिनेता आणि माजी मंत्री एन हरिकृष्णासह एनटीआर यांच्या तीन मुलांचं निधन झाले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment