Nitesh Ranes Allegations Of Corruption Against Vaibhav Naik : भाजप नेते नितेश राणे यांनी आमदार वैभव नाईकांवर टोकाचे आरोप केले आहेत. राणेंनी नाईकांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. नितेश राणे म्हणाले, ”वैभव नाईक यांनी बेनामी मालमत्तेसह १५० कोटींपेक्षा अधिक संपत्ती जमा केली आहे. २००९ मध्ये हा माणूस काय करत होता आणि २०१४ पर्यंत त्यांची संपत्ती एक कोटी वरून सात कोटी झाली. त्यानंतर २०१९ पर्यंत ही संपत्ती २० ते २५ कोटींएवढी झाली. वैभव नाईक यांच्या विरोधातील पुरावे आमच्याकडे आहे.”
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांची केंद्रीय तपास यंत्रणा एसीबीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. या कारवाईनंतर ठाकरे गटातील नेते आक्रमक झाले आणि कुडाळमध्ये नाईक यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाबाबत राणेंनी वक्तव्य केले. ते म्हणाले, हा मोर्चा काढून काय होणार आहे, असा सवाल राणेंनी पत्रकार परिषदेत विचारला.
हेही वाचा – T20 World Cup 2022 : कार्तिकनं घेतली वर्ल्डकपची पहिली हॅट्ट्रिक..! पाहा Video
राणे पुढे म्हणाले, “एसीबीला का वाटले वैभव नाईकची चौकशी करावी? चोऱ्यामाऱ्या करायच्या वैभव नाईकांनी, भ्रष्टाचार करायचा वैभव नाईकांनी, बेहिशेबी मालमत्ता जमा करायच्या वैभव नाईकांनी, आणि त्याच्या वतीने ही भटकी कुत्री एकत्र होणार आणि आमच्यावर भुंकत बसणार. यापेक्षा आमदार वैभव नाईकांनी सांगितले पाहिजे, किंवा एसीबीला उत्तर दिले पाहिजे, की त्यांची संपत्ती २००९ ते २०१९ पर्यंत अशी का वाढली. मी स्वच्छ आहे, हे नाईक यांनी सांगायला हवे. माझी सर्व संपत्तीचा हिशोब आहे. मी सगळे कर भरतो असे नाईक यांनी सांगायला हवे होते. महाराष्ट्रासमोर, सिंधुदुर्गाच्या जनतेसमोर मला कागदपत्रे आणि पुरावे दाखवायचे आहेत.”
”एसीबी, सीबीआय, ईडी, आयटी या देशातील नामांकित संस्था आहेत. आमच्याही चौकशा झालेल्या आहेत. या चौकशींदरम्यान आम्ही माहिती दिलेली आहे. स्वत:ला लपवण्यासाठी सामान्य शिवसैनिकाला वेठीस धरले जात आहे. स्वत:ची चोरी लपवण्यासाठी पक्षाला वेठीस धरले जात आहे”, असेही राणे म्हणाले.