“तो आणि त्याचा मुलगा आइस्क्रीमचा कोन घेऊन…”, नितेश राणेंनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली!

WhatsApp Group

Nitesh Rane On Mashal Symbol : महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या युद्धादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल चिन्ह देण्यात आले. त्याचवेळी त्यांच्या पक्षाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना ढाल-तलवार आणि गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव दिले. आता अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणूकीत ठाकरे गट आणि भाजप यांच्यात लढत होत आहे. या लढतीदरम्यान नितेश राणे यांनी ठाकरेंच्या मशाल चिन्हावर शेरेबाजी केली.

नितेश राणे म्हणाले, ”मशाल नाहीच आहे ना, तो आइस्क्रीमचा कोन आहे. उद्धव ठाकरेचं मशाल चिन्ह होऊच शकत नाही. त्या माणसामध्ये आग संपलेली आहे. तो फक्त थंड आइस्क्रीमचा कोन असू शकतो. ते बरोबर इलेक्शन कमिशनला कळलं, की हा थंड माणूस आहे आणि ह्याच्या हातात आइस्क्रीमचा कोन द्या. म्हणून आता घेऊन फिरेल, तो आणि त्याचा मुलगा.”

हेही वाचा – ठाकरे गटाला नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर निलेश राणे म्हणाले, “उद्धव खाजवू शकत…”

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि सत्ताधारी आमने-सामने असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. ठाकरे गटाने दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना तर भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने पक्षचिन्ह मिळूनही उमेदवार उभा केलेला नाही.

Leave a comment