NIA Biggest Raid : देशात दहशतवादी फंडिंग आणि कॅम्प चालवण्याच्या बाबतीत पीएफआय (PFI) म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर आज म्हणजेच गुरुवारी मोठी कारवाई होताना दिसत आहे. यूपी, महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडूसह देशातील सुमारे ११ राज्यांमध्ये, एनआयए आणि ईडीच्या पथकांनी पीएफआयच्या राज्यातील ते जिल्हा स्तरावरील नेत्यांच्या घरांवर छापे टाकले आहेत आणि त्यांच्या १०० हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. एनआयएने याला “आतापर्यंतचे सर्वात मोठे तपास ऑपरेशन” म्हटले आहे.
एनआयएने पीएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष ओएमएस सलाम आणि दिल्लीचे अध्यक्ष परवेझ अहमद यांना अटक केली. दरम्यान, दिल्लीतील एनआयए मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने जारी केलेल्या अलर्टनुसार, पीएफआयने यावेळी पुण्याला आपले केंद्र बनवले आहे, ज्यामध्ये अनेक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहेत. त्याच वेळी, एसडीपीआय जालना आणि औरंगाबाद येथे सदस्यत्व मोहीम राबवत आहे. मुंबईपासून राजस्थानपर्यंत अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा – रस्त्यावर भांडणाऱ्या विद्यार्थ्यांना भरधाव कारनं उडवलं..! धक्कादायक VIDEO व्हायरल
कुठून किती लोकांना अटक?
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेच्या नेतृत्वाखालील अनेक एजन्सींनी गुरुवारी सकाळी ११ राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले आणि देशातील दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याचा आरोप असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या १०६ कार्यकर्त्यांना अटक केली. अधिकाऱ्यांनी सांगितलं, की केरळ (२२), महाराष्ट्र (२०), कर्नाटक (२०), तामिळनाडू (१०), आसाम (९), उत्तर प्रदेश (८), आंध्र प्रदेश (५), उत्तर प्रदेश (४), पुद्दुचेरी (३), दिल्ली (३) आणि राजस्थान (२) मध्य प्रदेश (४) मध्ये सर्वाधिक अटक करण्यात आली. अनेक राज्यांमध्ये पीएफआयच्या प्रमुखाला अटक करण्यात आली आहे.
In major action being taken across 10 states, NIA, ED along with state police have arrested over 100 cadres of PFI: Sources pic.twitter.com/RPXBFxg1m2
— ANI (@ANI) September 22, 2022
PFI म्हणजे काय
PFI ची स्थापना २००६ मध्ये केरळमध्ये झाली आणि तिचे मुख्यालय दिल्लीत आहे. भारतातील उपेक्षित वर्गाच्या सक्षमीकरणासाठी एक नवीन सामाजिक चळवळ चालवण्याचा त्यांचा दावा आहे. पीएफआयने एक निवेदन जारी करून म्हटलं आहे, की ‘पीएफआयच्या राष्ट्रीय, राज्य स्तरावरील आणि स्थानिक नेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. राज्य समितीच्या कार्यालयाचीही झडती घेतली जात आहे. फॅसिस्ट राजवटीत असहमतांचा आवाज दाबण्यासाठी एजन्सींच्या गैरवापराला आमचा ठाम विरोध आहे.