

Andheri East Bypoll Election : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या १६६ – अंधेरी (पूर्व) या मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आज अखेर ३ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाकरिता राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी आपली नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केली आहेत.
महाराष्ट्रात भाजपसोबत युती करून सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे यांच्यासाठी एकनाथ शिंदे हे राजकीय आव्हान आहे. अंधेरी पूर्व विधानसभेच्या उद्धव ठाकरे यांनी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने पक्षचिन्ह मिळूनही उमेदवार उभा केलेला नाही. या ठिकाणी भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा – बापाला वाटायचं पोरगं वकील व्हावं, पण तो ‘जज’ झाला!