१३ हजार ३८० कोटींची संपत्ती..! आत्मनिर्भर पुणेकर तरुणी श्रीमंतांच्या यादीत! वाचा कोण आहे ती!

WhatsApp Group

Youngest Self-Made Woman Entrepreneur : स्ट्रीमिंग डेटा टेक्नॉलॉजी कंपनी कॉन्फ्लुएंटच्या सह-संस्थापक नेहा नरखेडे यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी भारतातील सर्वात तरुण आत्मनिर्भर महिला उद्योजकांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. बुधवारी, IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 (IIFL WEALTH HURUN INDIA RICH लिस्ट) प्रसिद्ध झाली आहे, ज्यामध्ये नेहा नरखेडे यांचं नाव देखील समाविष्ट आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची ही ११वी वार्षिक रँकिंग आहे.

विशेष म्हणजे, या वर्षीच्या यादीतील विक्रमी ७३५ उद्योजक म्हणजेच सुमारे ६७% लोक आत्मनिर्भर आहेत. यावर्षी ७९% (११७) नवीन चेहऱ्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. हुरुन रिच लिस्टनुसार, ११०३ व्यक्ती या यादीचा भाग आहेत, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ९६ अधिक आहे.

हेही वाचा – स्मार्टफोन घेताना या ६ गोष्टी नक्की लक्षात ठेवा..! फायदाच होईल

कोण आहेत नेहा नरखेडे?

जुलैमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिसर्च फर्म हुरुनच्या या यादीनुसार, नेहा नारखेडे पहिल्या १० श्रीमंत भारतीय महिलांमध्ये ८व्या स्थानावर आहे. नेहा नाखेडे, ३७ वर्षांच्या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत, त्यांची एकूण संपत्ती १३, ३८० कोटी आहे. नेहा नरखेडेचे पुण्यात वाढल्या. त्यांनी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी कॉलेज, SCTR मधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. जॉर्जिया टेक येथे कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. नंतर त्यांनी ओरॅकल आणि नंतर लिंक्डइन येथे आपल्या करिअरची सुरुवात केली, जिथे त्यांनी सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले. यानंतरच त्यांनी कॉन्फ्लुएंट (Confluent) सुरू करण्यासाठी कंपनी सोडली.

कॉन्फ्लुएंट कंपनीबद्दल

कॉन्फ्लुएंटचे कॅलिफोर्निया, यूएसए येथे कार्यालय आहे. कॉन्फ्लुएंट वैयक्तिक संस्थांना Apache Kafka-आधारित स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म प्रदान करते जे त्यांना रीअल-टाइम प्रवाहाच्या स्वरूपात डेटामध्ये सहज प्रवेश करण्यास सक्षम करते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment