NCP Leader Jitendra Awhad MLA Resignation : राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकी सोडण्याची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटाला विरोध केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर काही वेळातच आव्हाडांवर एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप झाला. मुंब्रा येथील नवीन पुलाच्या उद्घाटनावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कधीची घटना?
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना १३ नोव्हेंबर रोजी घडली. त्या दिवशी मुंब्रा येथील एका पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. पीडित महिला मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी निघाली होती. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना स्पर्श केला. मात्र, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी महिलेसह अनेक लोक मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी निघाले होते.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
हेही वाचा – Video : प्रवाशांचा अर्धा तास वाचणार..! मुंब्रा येथील वाय जंक्शन उड्डाणपुलाचे लोकार्पण
नेमकं काय केलं आव्हाड साहेबांनी बघा…
हा विनयभंग आहे का?#WeSupportJitendraAwhad @Awhadspeaks pic.twitter.com/I7VGfd1lNW— Akash Pandhare (@AkashPandhare03) November 14, 2022
महिलेच्या या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, पोलिसांनी माझ्यावर ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध मी लढणार आहे. आमदारकीचा राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीची हत्या आपण पाहू शकत नाही, असेही ते म्हणाले.
‘हर हर महादेव’ला विरोध
यापूर्वी ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाला विरोध केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती. स्थानिक चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या प्रकरणी अटकेनंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. ठाणे शहरातील एका मॉलमधील मल्टिप्लेक्समध्ये ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो खंडित केल्याप्रकरणी अटकेनंतर जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणी ११ जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.