ब्रेकिंग न्यूज..! राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक

WhatsApp Group

NCP leader Jitendra Awhad Arrested : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचे स्थानिक चित्रपटगृहात प्रदर्शन केल्याच्या निषेधार्थ ही कारवाई करण्यात आली आहे. चित्रपटात शिवाजी महाराजांचे चित्रण चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. त्यांच्याशी संबंधित ऐतिहासिक तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आहेत, असे त्यांचे मत होते.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत अटकेआधीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.  ते म्हणाले, “आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.”

हेही वाचा – टीम इंडियाचा हेड कोच बदलला! टी-२० वर्ल्डकपनंतर आता द्रविड नव्हे, तर…

“मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल,” असे आव्हाड यांनी सांगितले.

“हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही,” असेही आव्हाड म्हणाले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment