Sharad Pawar on Dsara Melava 2022 : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून अर्ज आले आहेत. अशा स्थितीत दोन्ही पक्षांमध्ये ‘महाभारत’ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे. ”संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करा आणि मैत्रीपूर्ण व्हा”, असं पवारांनी सांगितलं. दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर कार्यक्रमाला अद्याप परवानगी मिळालेली नाही, असंही सूत्रांचे म्हणणं आहे. १९६० पासून शिवसेना दरवर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित केला जातो.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत सर्व काही ठीक चाललेलं नाही. शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. दसरा मेळावा शिवसेनेसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. शिवाजी पार्कवरून होणाऱ्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांना ऐकण्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येत शिवसैनिक पोहोचायचे. बाळासाहेबांनंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याचं आयोजन करत आहेत. यावेळी हे प्रकरण रखडलं आहे. महापालिकेनं अद्याप परवानगी दिली नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान, या वादात राज्यातील सर्वात अनुभवी राजकारणी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उडी घेतली आहे.
हेही वाचा – मी पुन्हा देईन…पुन्हा देईन! मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना अजून एक धक्का; राज्यपालांना दिलं पत्र!
काय म्हणाले पवार?
शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या व्यक्तीनं संघर्ष होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यांचा दृष्टिकोन सर्वसमावेशक असावा. अशावेळी सर्वांना एकत्र घेऊन चालणं हे चांगलं काम होतं. कोणीही कोठेही रॅली करू शकते, कोणतीही समस्या किंवा टक्कर होणार नाही याची खात्री करण्यासाठी अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे.
“यंदा दसरा मेळाव्याला बोलावलं तर मी पण…''; नारायण राणेंच्या 'थेट' वक्तव्यामुळं वाद वाढणार?#maharastrapolitics #Dasara #Shivsena #DasaraMelava #NarayanRane #EknathShinde https://t.co/1bN8RiEx4i
— Vacha Marathi (@VachaMarathi) September 3, 2022
हेही वाचा – पेढे वाटा..! भारत बनली जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था; सर्वसामान्यांना होणार ‘असा’ फायदा!
ते पुढे म्हणाले, “जेव्हा एखादी व्यक्ती मुख्यमंत्र्यासारखे उच्च घटनात्मक पद धारण करते, तेव्हा ती महाराष्ट्रातील सर्व जनतेचं प्रतिनिधित्व करतं. मुख्यमंत्री कोणताही निर्णय घेताना किंवा इतरांचा विरोध असेल अशी कोणतीही कृती करताना आढळत नाहीत. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांनी केवळ पक्षांतर्गतच नव्हे तर विरोधकांसोबतही सौहार्दपूर्ण समीकरणं कायम ठेवली आहेत. भारताच्या राजकारणात सर्वत्र समतोल राखणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच विरोधी पक्षांमध्ये पवारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा शरद पवारांबद्दल आदर व्यक्त केला आहे. पवारांचं बोट धरून राजकारणात आल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं होतं.