NCB Seizes Rs 120 Crore Worth MD Drugs : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबई आणि गुजरातमधील जामनगर येथील गोदामातून ५० किलो मेफेड्रोन (MD ड्रग्ज) जप्त केले आहे. या प्रकरणी एनसीबीने एअर इंडियाच्या माजी पायलटसह ६ जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत १२० कोटी रुपये आहे. एनसीबी सर्व आरोपींची चौकशी करत आहे. या टोळीच्या म्होरक्याला याआधीच मँड्रेक्सच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
याबाबत एनसीबीचे डेप्युटी जनरल एसके सिंग यांनी सांगितले की, हे एमडी ड्रग मुंबई आणि जामनगर येथील एका गोदामातून जप्त करण्यात आले आहे. खबऱ्याच्या माहितीवरून गोदामावर छापा टाकण्यात आला. एनसीबीने या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून सराईत गुन्हेगारासह सहा जणांना अटक केली आहे. जामनगर येथून अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एकाचे नाव सोहेल गफ्फार असे आहे. जो २०१६ ते १८ दरम्यान एअर इंडियाचा पायलट होता.
NCB seizes 60 kgs high quality Mephedrone, busts syndicate and apprehends six persons including kingpin from multiple cities.#NCB pic.twitter.com/06e4SzxiYk
— BHUMI PLUS NEWS (@BHUMIPLUSNEWS2) October 7, 2022
हेही वाचा – India Vs Pakistan T20 Match : आज रंगणार भारत-पाकिस्तान मॅच..! वाचा कधी, कुठे, कशी पाहता येणार?
#UPDATE | NCB seized 60 kgs of high-quality Mephedrone (MD) worth approximately Rs 120 crores, busts syndicate and apprehends six persons including the kingpin from multiple cities: NCB pic.twitter.com/R2njqT4iyG
— ANI (@ANI) October 7, 2022
सुरुवातीच्या तपासात एनसीबीला जामनगर आणि मुंबईतील जप्त अमली पदार्थ प्रकरणाचे तार जोडलेले असल्याचे समोर आले आहे. जप्त केलेल्या एमडी ड्रगचे एकूण वजन ५० किलो असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे १२० कोटी आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) १६ किलो हेरॉईन जप्त केले. त्याचवेळी एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली. हेरॉइनची किंमत अंदाजे ८० कोटी रुपये होती. डीआरआय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हेरॉईन एका ट्रॉली बॅगमध्ये लपवले होते.