Narayan Rane Photo Morph on 25 paise : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनावर देवदेवतांचे फोटो छापण्याचे विधान करून राजकारणात नवी खळबळ उडवून दिली. आता भारतीय चलनावर वेगवेगळी चित्रे छापण्याची मागणी नेते करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र छापण्याची मागणी काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केली आहे. त्यांच्यानंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी थेट फोटोशॉप केलेल्या २०० रुपयांच्या नोटेचा फोटो शेअर केला असून, त्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज साकारण्यात आले आहेत.
केजरीवाल यांच्या मागणीनंतर चलनी नोटांवर कोणाचा फोटो असावा, ही मागणी जोर धरू लागली. विविध नेते आपल्या मागण्या मांडत आहेत. काहींनी बाबासाहेब आंबेडकर, नरेंद्र मोदी यांचा फोटो असण्याचे मत दिले. आता एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण यात २५ पैशाचे नाणे दाखवण्यात आले आहे आणि यावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा फोटो आहे.
हेही वाचा – देशात पोलिसांचा असणार एकच गणवेश..? PM मोदींनी मांडली संकल्पना!
व्हायरल फोटोमध्ये २५ पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो एडिट करून, संबंधित नाणे फायनल करा, अशी मागणी करण्यात आली आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या युवा मोर्चाने कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!