Nanded Govt Hospital Deaths Update : महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आता काँग्रेस पक्षाने दावा केला आहे की आणखी 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 31 वर पोहोचली आहे. मृतांमध्ये 4 लहान मुलांचा समावेश आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी सोशल मीडियावर म्हटले, ”मृत्यूंचा आकडा सतत वाढत आहे. कारण कालपासून रुग्णालयात आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी.”
रुग्णांच्या मृत्यूच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी (Govt Hospital Deaths In Nanded) सोमवारी स्थापन करण्यात आलेली तीन सदस्यीय तज्ज्ञ समिती मंगळवारी दुपारी आपला अहवाल सादर करणार आहे. 24 रुग्णांच्या मृत्यूबाबत डॉ. वाकोडे म्हणाले की, गेल्या 24 तासांत 12 अर्भक आणि 12 प्रौढांचा मृत्यू झाला आहे. सर्पदंश, फॉस्फरस विषबाधा आदी विविध आजारांमुळे 12 प्रौढांचा मृत्यू झाला.
हेही वाचा – Viral Video : शेतकरी ऑडी घेऊन आला, रस्त्यावर भाजी विकायला बसला!
याशिवाय ते म्हणाले, “येथे दूरदूरवरून लोक येतात. आम्हाला या रुग्णालयात सहसा आपत्कालीन आणि अत्यंत गंभीर प्रकरणे येतात. कारण 70-80 किमीच्या परिसरात आमच्यासारखे हॉस्पिटल उपलब्ध नाही. विविध कर्मचार्यांच्या बदल्यांमुळे आमच्यासाठी काही अडचण निर्माण झाली होती.” या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची (Nanded Govt Hospital Deaths) अधिक माहिती घेणार असून, याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!