Nitin Gadkari On Nagpur to Pune journey : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांबाबत मोठी घोषणा केली आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवासाचा वेळ आठ तासांवर आणणार असल्याचे सांगितले आहे. गडकरी म्हणाले की, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग नव्याने प्रस्तावित पुणे औरंगाबाद ऍक्सेस कंट्रोल ग्रीन एक्स्प्रेस वेशी जोडला जाईल, ज्यामुळे नागपूर ते पुणे अंतर आठ तासांत पूर्ण करण्यात मदत होईल. सध्या नागपूरहून पुण्याला पोहोचण्यासाठी १४ तास लागतात. अशा परिस्थितीत, नवीन प्रस्तावित कनेक्टिव्हिटीमुळे सुमारे ६ तासांचा वेळ कमी होईल.
ट्वीटमध्ये गडकरींनी ही घोषणा करताना लिहिले की, ‘नागपूर ते पुणे आठ तासांत प्रवास करणे शक्य होणार आहे. सध्या नागपूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग छत्रपती संभाजीनगर ‘औरंगाबाद’ जवळील नवीन प्रस्तावित पुणे-छत्रपती संभाजीनगर ‘औरंगाबाद’ ऍक्सेस कंट्रोल ग्रीन एक्स्प्रेस वेशी जोडला जाईल. ते पुढे म्हणाले की, NHAI द्वारे रस्ता पूर्णपणे नवीन संरेखित करून बांधला जाईल.
हेही वाचा – Video : अमरावतीमध्ये पत्यासारखी कोसळली इमारत..! चौघांचा मृ्त्यू
नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात होणार शक्य!
सद्यस्थितीत नागपूर ते पुणे हा प्रवास करताना प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगरजवळ नवीन प्रस्तावित पुणे – संभाजीनगर (औरंगाबाद) एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस-वे नी जोडण्यात येईल. pic.twitter.com/dX9EtRnmEj
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 30, 2022
हा महामार्ग NHAI द्वारे संपूर्ण नवीन अलाईंमेंट घेऊन तयार करण्यात येईल, यामुळे पुणे – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रवास अडीच तासांत आणि समृद्धी महामार्गाद्वारे नागपूर – छत्रपती संभाजीनगर प्रवास साडेपाच तासांत करता येणे शक्य होणार आहे. #PragatiKaHighway
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 30, 2022
समृद्धी महामार्गतर्फे पुणे ते छत्रपती संभाजीनगर ‘औरंगाबाद’ हा अडीच तासात आणि नागपूर ते छत्रपती संभाजीनगर ‘औरंगाबाद’ असा साडेपाच तासात प्रवास करणे शक्य होणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रगती का महामार्ग हॅशटॅगसह ट्वीट केले आहे.