नागपूर मेट्रोने रचला इतिहास..! जगातील कोणताही देश करू शकला नाही ‘हे’ काम, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान

WhatsApp Group

Nagpur Metro Creates World Record : नागपूर मेट्रोने इतिहास रचताना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. नागपूर मेट्रोने वर्धा रोडवर ३.१४ किमी लांबीची जगातील सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट मेट्रो बनविण्याचा विक्रम केला आहे. या किचकट कामासाठी नागपूर मेट्रोला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे.

नागपूर मेट्रोने इतिहास रचला

नागपूर येथील मेट्रो भवनात मंगळवारी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे न्यायाधीश ऋषी नाथ यांनी महाराष्ट्र मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना या विक्रमासाठी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. नागपूर मेट्रोने यापूर्वीच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. याआधी एवढी लांब मेट्रो डबल डेकर व्हायाडक्टची रचना कोणत्याही देशात बांधलेली नाही.

हा प्रकल्प खूप कठीण 

महाराष्ट्र मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, वर्धा रोडवर हा प्रकल्प सुरू करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. तीन थरांमध्ये बांधकामाचे काम अवघड होते. या रचनेच्या वरच्या बाजूला मेट्रो मार्ग आहे, त्याखाली हायवे आहे आणि तळाशी सध्याचा रस्ता आहे.

हेही वाचा – IND Vs BAN : अंगठ्याला दुखापत होऊनही रोहितनं दाखवलं शौर्य; बायको रितिका म्हणाली, “I Love You…”

नितीन गडकरी यांनी अभिनंदन केले

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही नागपूर मेट्रोच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. नागपूर मेट्रोच्या या प्रकल्पाशी संबंधित सर्वांचे गडकरींनी अभिनंदन केले आहे.

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment