NABARD Recruitment 2022 : सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात अनेकजण आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी सर्वांपासून चुकते. त्यामुळेच ‘वाचा मराठी’नं पुढाकार घेत, नोकरीची संधी आणि त्याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्यामुळं नोकरीची गरज असलेला तरुणवर्ग खालील ठिकाणी अर्ज करु शकतील.
नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) नं विकास सहाय्यक (NABARD Recruitment 2022) च्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार नाबार्डच्या www.nabard.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे विकास सहाय्यकांची एकूण १७७ पदं भरली जातील. उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्जाची प्रक्रिया १५ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर २०२२ आहे
नाबार्ड भरती २०२२ रिक्त पदांसाठी तपशील –
एकूण पदं – १७७
विकास सहाय्यक – १७३ पदं
विकास सहाय्यक हिंदी – ४ पदं
महत्वाची तारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – १५ सप्टेंबर २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑक्टोबर २०२२
हेही वाचा – Mazagon Dock Recruitment 2022 : माझगाव डॉकमध्ये १०४१ पदांसाठी भरती..! ‘असा’ करा अर्ज
वय मर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय २१ ते ३२ वर्षे दरम्यान असावं. तपशीलवार माहितीसाठी, उमेदवारांनी भरती अधिसूचना वाचावी.
शैक्षणिक पात्रता
विकास सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ५०% गुणांची आवश्यकता नाही.
जे उमेदवार विकास सहाय्यक (हिंदी) पदांसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी असणं आवश्यक आहे आणि अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून हिंदीचा अभ्यास केलेला असावा. या पदासाठी अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग प्रवर्गासाठी ५० टक्के गुणांची सक्ती नाही.
NABARD Recruitment Notification. pic.twitter.com/wRX1uGTJKa
— Subhash Samanto (@SubhashSamanto) September 11, 2022
हेही वाचा – दिवसातून एकदा जेवायचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती..! ‘असं’ होतं त्यांच्या दीर्घ आयुष्याचं रहस्य
अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करणार्या सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ४५० रुपये भरावे लागतील, तर SC, ST आणि भिन्न दिव्यांग श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५० रुपये भरावे लागतील.
पगार
पगार म्हणून निवडलेल्या उमेदवारांना ३२,००० रुपये महिना मिळतील.