Sharad Pawar And CM Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेते आशिष शेलार एका मंचावर दिसले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांसोबत आम्ही व्यासपीठ शेअर केल्याने काहींची झोप उडू शकते, असे शिंदे म्हणाले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या निवडणुकीपूर्वी एका खास डिनर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
यावेळी शरद पवारांनी सांगितलेल्या एका गोष्टीमुळे सभागृहात हशा पिकला. पवारांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील पवार-शिंदे सोयरिकीची माहिती दिली. ते म्हणाले, “माझे सासरे शिंदेच… आणि शिंदेंची मुलगी पवारांची बायको आहे. त्यामुळे शिंदेंना आपल्या मुलीची काळजी नीट घेण्यासाठी जावयाच्या ज्या काही सूचना असतील त्याचा गांभीर्यानं विचार करावा, अशी विनंती करतो.” पवारांच्या बोलण्यानंतर सभागृहात टाळ्या वाजवल्या गेल्या. पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे पाहून हातवारे करुन माझे सासरे शिंदेच असे म्हटले.
हेही वाचा – Jio Diwali Offer 2022 : जिओची ग्राहकांना दिवाळी भेट..! १५ दिवसांसाठी फ्री मिळणार..
मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमातून लाईव्ह https://t.co/fvsY18P2VJ
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 19, 2022
एकनाथ शिंदे यांनी या वर्षी जूनमध्ये शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड केले होते. यानंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले. शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ३९ आमदार शिंदे गटात दाखल झाले होते.