मुंबईत ‘या’ तीन ठिकाणी बॉम्ब ठेवलाय..! पोलिसांना फोन आल्यानंतर उडाली खळबळ

WhatsApp Group

Bomb Threat To Mumbai : एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांना शहरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी दिली. त्याने पोलीस हेल्पलाइन क्रमांक ११२ वर कॉल केला आणि सांगितले की मुंबई महानगरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब बसवण्यात आले आहेत. ही धमकी मिळताच पोलीस सतर्क झाले आणि बंदोबस्त वाढवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलरने इन्फिनिटी मॉल अंधेरी, पीव्हीआर मॉल जुहू आणि सहारा हॉटेल विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. काही वेळातच पोलिसांनी तिन्ही ठिकाणी बंदोबस्त वाढवला आणि या ठिकाणी शोधमोहीम सुरू केली. धमकी देणाऱ्या अनोळखी कॉलरचा शोध सुरू आहे.

गेल्या महिन्यातही धमकी 

यापूर्वी २३ सप्टेंबरलाही मुंबईत बॉम्बस्फोटाच्या धमकीचे फोन आले होते. सांताक्रूझ परिसरातील अनेकांना फोन करून धमकावण्यात आले. त्यानंतरही मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
याआधी एप्रिलमध्ये, कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादाच्या दरम्यान, बगळुरूमधील काही शाळांमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते, कारण हा राज्यातील शांतता भंग करण्याचा कट असू शकतो. कर्नाटक हे पुरोगामी राज्य असून काही लोकांना येथे अशांतता निर्माण करायची आहे. धमकी देणाऱ्याला अटक करण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा – महाराष्ट्राचे CM शिंदेंसमोर शरद पवारांची ‘गूगली’..! सासरची ‘ही’ गोष्ट सांगताच सगळे हसू लागले

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment