मुंबईतील माटुंगा परिसरात क्रिकेट सामन्यादरम्यान 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तो ज्या मैदानात क्रिकेट खेळत होता, त्या मैदानात एकाच वेळी दोन सामने खेळले जात होते, त्यामुळे दुसऱ्या सामन्याचा चेंडू त्याच्या कानाच्या बाजूला लागला आणि तो तिथेच पडला. जखमी व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी मुंबईतील माटुंगा येथील दादकर मैदानावर टी-20 सामना खेळवला जात होता. या मैदानावर एकाच वेळी दोन सामने खेळले जात होते, दोन्ही सामने एकाच स्पर्धेचे होते. हा सामना 50 वर्षांवरील लोक खेळत होते. या खेळाडूंपैकी एक होता 52 वर्षांचा जयेश सावला.
हेही वाचा – श्रेयस अय्यर 4 वर्षानंतर खेळणार रणजी ट्रॉफी, मुंबईच्या संघात समावेश
मुंबईत सहसा एकाच मैदानावर अनेक सामने खेळले जातात आणि काहीवेळा खेळाडू इतर सामन्यांच्या चेंडूमुळे जखमी होतात, परंतु सामन्यादरम्यान चेंडू लागून एखाद्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
माटुंगा पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एडीआरची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे. सध्या कोणाचीही चौकशी झालेली नाही, मात्र गरज पडल्यास चौकशी करता येईल. शवविच्छेदनानंतर जयेश सावला यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. जयेश हा व्यवसायाने व्यापारी होता.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!