मुकेश अंबानींची ‘मोठी’ घोषणा! या दिवाळीपासून भारतात सुरू होणार…

WhatsApp Group

Reliance Jio 5G : 5G नेटवर्कसाठी सर्वसामान्यांची प्रतीक्षा संपली आहे. आज घोषणा करताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी म्हणाले, की दिवाळीपासून देशात रिलायन्स जिओची 5G सेवा सुरू होईल. यावर्षी दिवाळी २४ ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. त्यामुळं जिओ (JIO 5G) देखील २४ ऑक्टोबरपासून सुरू होईल. देशातील पहिल्या चार महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे 5G सेवा सुरू केली जाईल. यानंतर देशातील इतर शहरांमध्येही दर महिन्याला ही सेवा उपलब्ध होणार आहे. २०२३ पर्यंत देशातील प्रत्येक गावात सेवा उपलब्ध होईल, असं मुकेश अंबानी म्हणाले आहेत.

5G लोकांचं जीवन बदलेल

मुकेश अंबानी म्हणाले, ”रिलायन्स जिओ 5जी हा ट्रू 5G असेल. ते 4G वर अजिबात अवलंबून राहणार नाही. ते म्हणाले की Jio True 5G सह आम्ही कृषी, आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवून आणण्याचं काम करू. यामुळे लोकांच्या जीवनात मोठा बदल होणार आहे. Jio 5G च्या माध्यमातून आम्ही देशातील सर्व लोकांना जोडू. Jio 5G सह आम्ही अमेरिका आणि चीनला मागे टाकू. Jio 5G जगातील सर्वोत्तम असेल.”

हेही वाचा – जग सोडून गेल्यानंतरही ‘तुफान’ पैसे कमावणारा माणूस म्हणजे मायकल जॅक्सन!

Jio Airfiber लाँच करण्याची घोषणा

आकाश अंबानी यांनी Jio Airfiber ची खासियत सांगितली. ते म्हणाले, ”यामध्ये लोकांना कोणत्याही वायरशिवाय हायस्पीड ब्रॉडबँड घरपोच मिळेल.” मुकेश अंबानी म्हणाले, ”ब्रॉडबँड वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये रिलायन्स जिओनं भारताचा समावेश जगातील टॉप १० देशांमध्ये केला आहे. आजच्या काळात तीनपैकी दोन ग्राहक त्यांच्या इंटरनेट गरजांसाठी जिओ फायबर निवडतात.”

फेसबुक, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलनंतर मुकेश अंबानी यांनी आज क्वालकॉम (Qualcomm) सोबत भागीदारीची घोषणा केली. मुकेश अंबानींसोबत स्टेज शेअर करताना क्वालकॉमचे सीईओ क्रिस्टियानो आमोन म्हणाले, की तंत्रज्ञानाच्या जगात मोठा बदल घडवून आणण्यासाठी ते रिलायन्ससोबत काम करतील.

एकप्रकारे मुकेश अंबानी यांनी हळूहळू आपल्या व्यवसायाची जबाबदारी नव्या पिढीकडं सोपवण्याचे संकेत दिले आहेत. ते आज रिलायन्सच्या ४५ व्या एजीएममध्ये म्हणाले, की ते आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांच्याकडं व्यवसायाच्या विविध विभागांमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या सोपवत आहेत. या अंतर्गत आकाश अंबानी यांना रिलायन्स जिओची जबाबदारी देण्यात आली आहे. रिलायन्स रिटेलच्या व्यवसायाची जबाबदारी ईशा अंबानींकडं देण्यात आली आहे. त्याचवेळी अनंत अंबानींचा नव्या ऊर्जा व्यवसायात समावेश केला जात आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment