दिवाळीत प्रवाशांसाठी चांगली बातमी..! एसटी सोडणार १४९४ जादा गाड्या

WhatsApp Group

MSRTC To Run Extra Buses in Diwali 2022 : दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एसटी जादा गाड्या सोडणार आहे. यासाठी मंडळ (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) दिवाळीच्या काळात तिकिटांच्या दरात १० टक्क्यांची हंगामी वाढ करणार आहे. दिवाळीत एसटीच्या तिकिटांसाठी लोक रांगा लावतात. एसटी महामंडळ २१ ऑक्टोबर २०२२ पासून ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंतच्या ११ दिवसांच्या कालावधीसाठी १४९४ अतिरिक्त गाड्या सोडेल. एसटीची दरवाढ २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल आणि ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत दरवाढ लागू असेल.

जाहीर केलेल्या नियोजनानुसार एसटी महामंडळ औरंगाबाद विभागातून ३६८, मुंबई विभागातून २२८, नागपूर विभागातून १९५, पुणे विभागातून ३५८, नाशिक विभागातून २७४ आणि अमरावती विभागातून ७१ जादा बस सोडणार आहे.

हेही वाचा – Himachal Pradesh Election 2022 : निवडणुकीच्या तारखा जाहीर..! ‘या’ तारखेला लागणार निकाल

Leave a comment