MPSC Exam Postpone : एमपीएससीची 28 एप्रिल व 19 मेची परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारखा…

WhatsApp Group

MPSC Exam Postpone : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २८ एप्रिल, २०२४ रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, १९ मे, २०२४ रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या सरळसेवा चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील.

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता अधिनियम, २०२४ मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता, शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त नमूद परीक्षांच्या बाबतीतील पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येणार असल्याचे आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘नो कॉस्ट ईएमआय’ काय असतो? खरंच एक्स्ट्रा पैसे द्यावे लागत नाहीत? लगेच समजून घ्या!

0000

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment