MNS On Uddhav Thackeray : शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना ‘मुन्नाभाई’ म्हटलं होतं. गोरेगावच्या नेस्को मैदानावर हा मेळावा पार पडला. उद्व ठाकरे म्हणाले होते, ”मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप (BJP) आणि शिंदे गटासोबत ‘मुन्नाभाई’ आपल्यावर हल्ला करणार आहेत. त्यामुळे ही लढाई किती अटीतटीची होईल, हे लक्षात घ्या.” आता या टीकेला मनसे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरेंचा ‘मामू’ उल्लेख!
गजानन काळे यांनी ट्विट करुन त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘मामू’ असा केला. ”आदित्य ठाकरेसाठी वरळीत मनसे उमेदवार न देता राजसाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला. २०१२ ला एकनाथ शिंदेनी राजसाहेबांची भेट घेतली असता ठाणे मनपात सेनेच्या महापौरसाठी मनसेच्या ७ नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला. मुन्नाभाईचं काळीज कळायला ‘मामू’ला अजून सात जन्म घ्यावे लागतील. गेट वेल सून मामू”, असं गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.
हेही वाचा – आमिर खानच्या लेकीचा साखरपुडा..! बॉयफ्रेंडनं सर्वांसमोर केलं प्रपोज; पाहा VIDEO
आदित्य ठाकरेसाठी वरळीत मनसे उमेदवार न देता राजसाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला.
२०१२ ला एकनाथ शिंदेनी राजसाहेबांची भेट घेतली असता ठाणे मनपात सेनेच्या महापौरसाठी मनसेच्या ७ नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला.
मुन्नाभाईच काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील.
गेट वेल सून मामू— Gajanan Kale (@GajananKaleMNS) September 23, 2022
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे गट, भाजपा, राज्य सरकार यांच्यावर तोंडसुख घेताना मनसेला टोला लगावला होता. आता ‘मामू’ अर्थात मुन्नभाई चित्रपटातील बोमन इराणी यांच्या पात्राची उपमा मनसेनं उद्धव ठाकरेंना दिली आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!