MNS Chief Raj Thackeray : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. अजित पवार आपल्या 30 समर्थक आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री म्हणूनही शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यानंतर छगन भुजबळांसह राष्ट्रवादीचे 9 आमदार महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर अनेक नेते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही मोठे मत दिले आहे.
राज ठाकरे यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया शेअर केली. ते म्हणाले, ”आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.”
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 2, 2023
हेही वाचा – डबल इंजिनचं सरकार आता ट्रिपल इंजिनचं झालंय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
NCP leader Ajit Pawar takes oath as the Deputy Chief Minister of Maharashtra at Raj Bhawan. pic.twitter.com/fs3Tn65LLD
— ANI (@ANI) July 2, 2023
ठाकरे पुढे म्हणाले, ”ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?”
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!